18.7 C
New York
Friday, April 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. अ‍ॅग्रीच्या माजी विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश

क्षितिज पाटील यांची डीएसपी, संकेत कराळे यांची सहाय्यक गट विकास अधिकारीपदी निवड

 

डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे (बी. टेक. अ‍ॅग्री) येथील दोन माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा-2024 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 

महाविद्यालयातील २०१५ ते २०१९ च्या बॅचचे विद्यार्थी क्षितिज शंकर पाटील यांची पोलीस उपाधीक्षक (डीएसपी) गट-अ या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. राधानगरी तलुक्यातील मोहडे येथील ते रहिवासी आहेत. तसेच २०१३ ते २०१७ बॅचचे विद्यार्थी संकेत बलभीम कराळे यांची सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर निवड झाली आहे. ते अहिल्यानगर येथील बुरहाननगरचे रहिवासी आहेत.

 

या दोन्ही विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य व कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, अभ्यासासाठी पूरक वातावरण आणि तज्ज्ञ व्याख्यानांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना सक्षम बनविले जाते. क्षितिज व संकेत यांचे यश हे पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य, इंजि. पी. डी. ऊके यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles