22.1 C
New York
Thursday, September 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संजीवन विद्यालयाची दुहेरी बाजी; १७ वर्षांखालील मुले व मुली गटाचे विजेतेपद पटकावले

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत संजीवन विद्यालयाची दुहेरी बाजी

१७ वर्षांखालील मुले व मुली गटाचे विजेतेपद; अल्फोंसा स्कूल व गिजवणे हायस्कूलला तृतीय क्रमांक

कोल्हापूर, प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा–२०२६ अंतर्गत १७ वर्षांखालील मुले व मुली गटातील सामने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दोन्ही गटांमध्ये संजीवन विद्यालय व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांनी दमदार कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.

मुले गट

उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे यांनी अल्फोंसा स्कूल, पाडळीचा २-० असा पराभव केला. विजयी संघाकडून अभिषेक वाळवेकर आणि आरुष पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात संजीवन विद्यालय व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांनी संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळावर ६-० असा दणदणीत विजय मिळविला. राजहंसनम आणि योइनधेईबा मायनागबाम यांनी प्रत्येकी दोन गोल करत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात अल्फोंसा स्कूल, पाडळीने संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळाचा सडन डेथमध्ये १-० असा पराभव करून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानले.

अंतिम सामन्यात संजीवन विद्यालय व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रेचा २-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून योइनधेईबा आणि मायनागबाम यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

विजयी संघ : अलर्वेरितान युनाम, परीसाँन थोकचोम, अदिराज जाधव, पृथ्वीराज चव्हाण, विश्वेश देशपांडे, धिरज कुरबेदी, राज हाँश्वेन, अविनाश, इस्ट्रोन, थोईथोबा, पिक्टा, मेहराव, क्षितिज बारस्कर, ऋनुवज राठोड, देवराज पवार, कवोत सिंग आणि चिथो निमयोजान.

मुली गट

पहिल्या उपांत्य सामन्यात संजीवन विद्यालय व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांनी गिजवणे हायस्कूल, गिजवणेचा ५-० असा पराभव केला. तनिया हिने दोन, तर गुणगुण आणि मलंगंबी यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी यांनी डॉ. सायरस पूनावाला स्कूल, पेठवडगावचा ५-० असा पराभव केला. दिव्या गायकवाड हिने दोन, तर देवयानी पाटील, यशस्वी बेनाडे आणि समीक्षा चौगुले यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात गिजवणे हायस्कूल, गिजवणेने डॉ. सायरस पूनावाला स्कूल, पेठवडगावचा १-० असा पराभव केला. अर्पिता चौगुले हिने सामन्यातील एकमेव गोल नोंदविला.

अंतिम सामन्यात संजीवन विद्यालय व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांनी श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरीवर ७-० अशी एकतर्फी मात करत विजेतेपद पटकावले. तनिया तोरेबम हिने तीन, पूनम रोकडे हिने दोन, तर इंचंबी, लंबचेबी तोरेबम आणि रिना सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मुली गटातील विजयी संघ : श्रेया भाग्यवंत, आर्या संबळ, तनिया तोरेबम, लंबचेबी तोरेबम, रिना सिंग, टिना नवरेम, गुणगुण अकोईजा, केलबीण, एरिना, देविया इरामे, पूनम रोकडे, पूजा गोवाला, कुमकुम, रेवा सोनवणे आणि मालेनगेबी यंगत्रे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles