25.3 C
New York
Wednesday, June 3, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

माथेरानमध्ये शिवकालीन पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 

सत्याचा शिलेदार वार्तापत्र | चंद्रकांत काळे, रायगड (माथेरान)

माथेरान येथे परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवकालीन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घनदाट जंगलात वसलेले, प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल यांच्या बलिदानानेही ही भूमी पावन झाली आहे.

माथेरान शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने पवित्र अक्षय तृतीया या दिवशी हा सोहळा पार पडला. शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत हा उत्सव जल्लोषात साजरा केला.

श्रीराम चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी यामुळे वातावरण भारावून गेले होते.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील अर्धपुतळ्यास शिवसेना शाखाप्रमुख मनोज खेडकर यांनी, तर वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्यास माजी नगरसेवक प्रदीप घावरे यांनी पुष्पहार अर्पण केला. स्वातंत्र्यसैनिक स्तंभांना महिला पदाधिकारी अंकिता तोरणे व प्रीती कळंबे यांनी अभिवादन केले.

संध्याकाळी शिवकालीन परंपरेनुसार भव्य मिरवणूक काढण्यात आली. घोडेस्वारांसह अष्टमंडळाचे ऐतिहासिक देखावे, दांडपट्टा, तलवारबाजी, लेझीम, ढोल-ताशे, झांजपथक आणि वारकरी संप्रदायाच्या भजनांनी वातावरण दुमदुमून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी हा मिरवणुकीचा मुख्य आकर्षण ठरला.

माथेरानच्या लाल मातीचे रस्ते, हिरवाईने नटलेले परिसर आणि पारंपरिक सादरीकरणामुळे हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. अनेकांनी या नेत्रदीपक मिरवणुकीचे चित्रीकरण करून हा अनुभव संस्मरणीय असल्याचे सांगितले.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles