24.3 C
New York
Saturday, June 13, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात इचलकरंजीत औषध दुकाने बंद

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात इचलकरंजीत पाचशेहून अधिक औषध दुकाने बंद

इचलकरंजी:अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने बुधवार, दि. 20 मे रोजी बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्रीविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदला इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इचलकरंजी परिसरातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला.

यामध्ये इचलकरंजी परिसरातील 500 पेक्षा अधिक औषध दुकानदारांनी एकजूट दाखवत मंगळवारी रात्री 12 नंतर ते बुधवारी रात्री 12 पर्यंत कडकडीत बंद पाळला. तसेच कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चामध्ये जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा संचालक कुमार बोरगावे, जिल्हा संचालक संतोष पाटील, सुनील पाटील, संजय हारगे तसेच इचलकरंजी असोसिएशनचे सचिव शहाजी राणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, संचालक व सभासद बंधू-भगिनी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles