25.3 C
New York
Wednesday, June 3, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

माजी उपसरपंच सुनील थोरात यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कै शंकरराव आबासाहेब थोरात यांच्या स्मरणार्थ जमीन केली दान

 

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड गावचे सुपुत्र तथा माजी उपसरपंच श्री सुनील शंकरराव थोरात तसेच पुतणे जीवन धनंजय थोरात, अविनाश अशोक थोरात यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने प्रेरित होऊन आपले वडील तसेच आजोबा कै शंकरराव बाबासाहेब थोरात यांच्या प्रेरणेने तसेच त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारच्या हर घर जल या महत्त्वाकांक्षी नियोजित जल जीवन प्रकल्पासाठी स्वमालकीची उत्तरमांड नदी काठालगत असलेली अर्धा गुंठे जमीन ग्रामपंचायतीला दानपत्राद्वारे देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच या कृतीद्वारे थोरात कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गावास जल जीवन प्रकल्प मंजूर तर झाला होता.परंतु,खरी अडचण होती पंप हाऊस,फिल्टरेशन प्लांटसाठी लागणाऱ्या जागेची. कळंत्रेवाडी गावात वरदान लाभलेल्या उत्तरमांड नदीकाठी जागा उपलब्ध होणं जलजीवन प्रकल्पासाठी अत्यंत आवश्यक होतं. ग्रामपंचायतीकडून विविध शक्यता पडताळल्या जात होत्या.दरम्यान, जागेच्या समस्येची बाब माजी उपसरपंच सुनील थोरात व कुटुंबियांच्या कानावरती पडताच सुनील थोरात व त्यांचे दोन पुतणे जीवन थोरात,अविनाश थोरात व घरातील इतर सदस्यांनी आपापसात चर्चा करून उत्तरमांड नदीकाठी असलेल्या आपल्या स्वमालकीच्या गट क्रमांक तीन मधील काही क्षेत्र जलजीवन प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीला दानपत्राद्वारे देण्याचे ठरवले. त्यानुसार माजी उपसरपंच सुनील थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच गोपाळराव येळवे उर्फ बापू यांच्याशी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाशी प्राथमिक चर्चा करून जागा दान करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि दानपत्राचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जवळपास अर्धा गुंठे इतके क्षेत्र ग्रामपंचायत प्रशासनाला दानपत्राद्वारे जलजीवन प्रकल्पासाठी देण्यात आले. दरम्यान,त्यावेळचे तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील तसेच तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते घेण्यात आलेल्या जलजीवन प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात थोरात कुटुंबियांचा सत्कार देखील करण्यात आला. आजकालच्या स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने प्रेरित होऊन समाजासाठी आपल्या पश्चातही चिरंतर,शाश्वत असे कार्य करणारी सुनील थोरात आणि कुटुंबियांसारखी दानशूर व्यक्तिमत्वं फारच दुर्मिळ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नसून वडिलांच्या तसेच आजोबांच्या प्रेरणेने त्यांच्या स्मरणार्थ थोरात कुटुंबियांनी केलेले सत्कार्य समाजासाठी अनंतकाळ प्रेरणा देत राहील, हे मात्र नक्की…!

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles