23.4 C
New York
Friday, April 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 105 कवींचे भव्य सतेज काव्य संमेलन 11 एप्रिलला… 

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 105 कवींचे भव्य सतेज काव्य संमेलन 11 एप्रिलला…

पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार भूपाल शेटे यांना जाहीर : सुरेश केसरकर

 

पत्रकार :- सचिन लोहार

 

सतेज काव्य मंचच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे काँग्रेस पक्षाचे गट नेते, माजी गृह राज्यमंत्री, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 11 एप्रिल, 2026 रोजी सकाळी 10:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी कवी डॉ. वसंत भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सतेज काव्य संमेलन होणार असून यावेळी कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा पहिला सतेज कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते व निमंत्रक सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील विविध भागातून सहभागी होणार्‍या या कवी संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक व चित्रकार मिलिंद यादव यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, सामाजिक कार्यकर्ते सचिन खराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून रोख पाच हजार रुपये, पंचवीस हजारांची पुस्तके आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

भूपाल शेटे यांनी गेली 35 ते 40 वर्षे कुष्ठरोगी बांधवांची सेवा केली आहे. स्वखर्चातून दरवर्षी कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम करत असतात. राजकारण, समाजकारण व कुष्ठरोग्यासह वंचित, बहुजन समूहासाठी भूपाल शेटे यांनी भरीव काम केले आहे. या दखलपात्र कामासाठी त्यांचा पद्मश्री डॉ. बाबा आमटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारा रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते.डॉ. मिनल राजहंस, डॉ. वसंत भागवत संपादित नव्या विचारांच्या नव्या कविता या कवितासंग्रहाचे यावेळी प्रकाशन होणार असून कवी डॉ. किरण भिंगारदेवे, डॉ. कपिल राजहंस, रंजना सानप, डॉ. सागर भजनावळे, शांतीलाल कांबळे, प्रा. भाऊसाहेब गोसावी, प्रा. प्रकाश नाईक, विद्रोही पि. के., रमेश नाईक, उद्धव पाटील, प्रकाश शिंदे, युवराज सावंत, बाबुराव कांबळे, उमेश शिरगुप्पे, प्रा. संजय कांबळे, प्रा. सचिन बेलेकर, राजकुमार किर्दत, दत्तात्रय पाटील, रवींद्र फडणीस, युवराज पाटील, परशुराम कांबळे, अंकिता कांबळे, डॉ. दत्ता ठुबे, स्वाती कोरगावकर, जान्हवी कांबळे, वसुंधरा निकम, शिवाजी पाटील, प्राचार्या शालिनी पवार, सोमनाथ दळवी, सुनील गोडबोले, किरण पाटील, राजश्री दळवी, सागर सोनवणे, रघुनाथ कापसे, सुवर्णा शहा, प्रताप घेवडे, दीप्ती कुलकर्णी, विजयकुमार पोवार, राहुल राजापुरे, विनायक कुलकर्णी, नितीन पवार, सुरेश कुलकर्णी, नामदेव हुले, सुरेश पुनाळकर, दादासाहेब सादोळकर, कवी श्रीलता, प्रमिला कुलकर्णी, निशा खरात, डॉ. जगन्नाथ कांबळे, किरण मेस्त्री, डॉ. मिलिंदराज कांबळे, रमेश मोटे, श्रद्धा सूर्यवंशी, विनायक यादव, शरद गुरव, रवींद्र भोसले, भार्गवी कुलकर्णी, सुचित्रा पवार, दिनकर साळोखे, दिलीप नेवसे, जान्हवी सावंत, रोहिणी पराडकर, कल्याण श्रावस्ती, अपूर्वा पाटील, उर्मिला तेली, सुवर्णा वाघमारे, अनिल कलकुटकी, धोंडीलाल नूर मोहम्मद मुजावर, प्रकाश पोतदार, विलास साठे, मंगेश रावळ, वेदा माळकर, सुवर्णा पवार, अपर्णा पाटील, वैभव ढोबळे, दिलीप पाटील, अर्जुन जाधव, आरती मांढरे, जयश्री जगताप, सलीम शेख, मेघा शहा, स्मिता चोथे, सुस्मिता रेंदाळकर, रावसाहेब पाटील, भूपाल कांबळे, लक्ष्मण शिंदे, मायकल जॉन डिसोजा, सरस्वती डवरी, गणेश गायकवाड, योगिता कोठेकर, सुनिल जाधव, रामचंद्र कांबळे, संजय पाटील, महंमद नाईकवाडे, विठ्ठल जावळे, जगन्नाथ मोरे, बाबासाहेब कांबळे, सुहासीनी शेळके, नंदिनी चांदवले, माधवी पोवार, श्याम कारंजकर, संजय माळी, संजय माने, वर्षा ढाले आदी. कवी सदर कवी संमेलनात आपल्या कविता सादर करणार आहेत.

काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला अनिता काळे, अंतिमा कोल्हापूरकर, भगवान माने, संभाजी थोरात, संजय सासने, दिनकर आडसूळ उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles