25.3 C
New York
Wednesday, June 3, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, राजकीय वर्तुळात खळबळ

अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्र महसूल विभागात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात शासनाने मोठी कारवाई करत उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना निलंबित केले आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय तसेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्राथमिक तपासात अभिजीत भांडे यांनी अशोक खरात याच्या माध्यमातून आपल्या पत्नीच्या नावे मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यवहारांमधील निधीचा स्रोत, आर्थिक देवाणघेवाणीतील पारदर्शकता आणि संबंधित कागदपत्रांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यानंतर शासनाने तातडीने कारवाई करत भांडे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

 

पत्नीच्या नावे आर्थिक गुंतवणूक केल्याचा आरोप; प्राथमिक तपासात आढळले धक्कादायक तथ्य

दरम्यान, शासनाने केवळ निलंबनावर न थांबता भांडे यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील विविध व्यवहारांची तपासणी केली जाणार असून, अशोक खरातसोबतचे आर्थिक आणि प्रशासकीय संबंधही तपासले जाणार आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदापासून दूर ठेवण्यात येणार आहे.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही अस्वस्थता वाढली आहे. अशोक खरात यांच्या चौकशीतून काही बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles