28 C
New York
Wednesday, June 3, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने डॉ. शंकर पुजारी यांचा नागरी सत्कार 

कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने डॉ. शंकर पुजारी यांचा नागरी सत्कार 

 

कुंभोज उरूस व यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने प्रा. डॉ. शंकर पुजारी यांचा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग या अद्ययावत तंत्रज्ञान क्षेत्रात पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल फेटा, शाल व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग या आधुनिक व अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात पीएच.डी. पदवी संपादन करणारे ते या परिसरातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यामुळे कुंभोज गावाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

डॉ. शंकर पुजारी यांनी कॉम्प्युटर सायन्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेत गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे आपण अत्यंत भारावून गेलो असून गावकऱ्यांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल आपण कृतज्ञ असल्याची भावना डॉ. शंकर पुजारी यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी डॉ. शंकर पुजारी यांच्या पीएच.डी. पर्यंतच्या प्रेरणादायी शैक्षणिक प्रवासाचे मनःपूर्वक कौतुक केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles