22.6 C
New York
Thursday, September 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

हेरलेच्या योगेश पाटील यांची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड

हेरलेच्या योगेश पाटील यांची राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड

रुकडी / प्रतिनिधी

हेरले (ता. हातकणंगले) येथील कु. योगेश पद्मजा अण्णासो पाटील यांनी राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) पदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे हेरले गावाचे नाव उज्ज्वल झाले असून, योगेश यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचेही परिसरातून कौतुक होत आहे.

योगेश पाटील यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, रुकडी तसेच आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठ वडगाव येथे झाले. त्यानंतर त्यांनी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे येथून त्यांनी बी.टेक. पदवी संपादन केली.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर योगेश यांनी पुणे येथील विराचार्य अकादमी धर्मनगर व JITO पुणे येथे सुमारे सात वर्षे राज्यसेवा परीक्षेची तयारी केली. या कालावधीत त्यांनी विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षा अनेक वेळा दिल्या. मात्र, अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अखेर राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) पदाच्या परीक्षेत यश मिळविले.

योगेश यांच्या यशाची बातमी समजताच हेरले गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आदर्श ग्रुपच्या वतीने गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत योगेश पाटील यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles