23.3 C
New York
Thursday, September 17, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

मेन राजाराममध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात

पारंपरिक अन्नसंस्कृती, आरोग्य आणि निसर्गसंवर्धनाचा विद्यार्थ्यांना परिचय

 

कोल्हापूर | प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रानभाज्या महोत्सव उत्साहात आयोजित करण्यात आला. फास्ट फूडच्या वाढत्या प्रभावाच्या काळात विद्यार्थ्यांना परिसरात उपलब्ध असलेल्या रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि औषधी वनस्पतींची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या आरोग्यदायी महत्त्वाची माहिती मिळावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संतोष माने म्हणाले, “रानभाज्या महोत्सव हा केवळ खाद्यपदार्थांचा उत्सव नसून निसर्ग, आरोग्य, शेती आणि पारंपरिक अन्नसंस्कृती जपणारा उपक्रम आहे. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध पौष्टिक रानभाज्यांची ओळख करून देऊन त्यांचा आहारातील वापर वाढविणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमधून स्थानिक रानभाज्यांचे संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती होण्यास मदत होते.”

विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक भाज्या व खाद्यपदार्थ स्वतः तयार करून आणले. विद्या कांबळे हिने मेथी व कुर्डू, सलोनी धनवडे हिने नाचणी भाकरी व अळूवडी, श्रुती चौगुले हिने शेपू व बाजरी भाकरी, आफ्रीन सर्जेखान हिने तोंडली, पडवळ भाजी, कोरट्याची चटणी व अळू, तर सिद्धी माने हिने पोकळा, डांगर, खर्डा, राळे व बाजरी भाकरी सादर केली.

स्वराज्ञली पाटील हिने कांद्याची चटणी, खर्डा, मेथी, चाकवत व तांदळाची भाकरी, श्रेया कळंत्रे हिने भरले वांगे, भरीत, माठ व पातरीची भाजी, प्रियांका खाडे हिने घोळीची व अंबाड्याची भाजी तसेच ज्वारीची भाकरी, अनुराधा सिद्धनेर्ली हिने शेंगदाण्याची चटणी, तीन तोंडाची भाजी व ऊसावरच्या शेंगांची भाजी सादर केली. संध्या पोवार हिने गोडी कारल्याची भाजी व लसणाची चटणी, प्रतिक्षा बोडके हिने पिठले-भाकरी, तर माया भुजिंगे हिने दही, म्हाईनमुळ्याचे लोणचे व सॅलड सादर केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक खाद्यपरंपरा, पौष्टिक आहार, पर्यावरण आणि ग्रामीण संस्कृती यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. रानभाज्यांचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. अनिल लाड, प्रास्ताविक उपप्राचार्या प्रा. वनिता खडके, आभार प्रा. बाबासो माळवे यांनी मानले. संयोजन प्रा. सुषमा पाटील यांनी केले. यावेळी प्रा. राहुल देशमुख, प्रा. हर्षवर्धन काटकर, प्रा. संजय कुंभार, प्रा. अयोध्या धुमाळ, प्रा. दीपा लोहार, प्रा. प्रमिला मळगे, राजू मोरे, प्रफुल्ल कदम, संगिता चव्हाण, शुभम गुरव, स्वप्नील यांच्यासह कला शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles