24.3 C
New York
Saturday, June 13, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

रविकिरण बळे यांना ‘शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’

रविकिरण बळे यांना ‘शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’

 

रुकडी / प्रतिनिधी :

दैनिक रोखठोक व्हिजनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात रुकडी (ता. हातकणंगले) येथील प्रतिनिधी तथा रुकडी ग्रामीण पत्रकार संघाचे खजिनदार रविकिरण सुदाम बळे यांना ‘शिवछत्रपती राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार – २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दैनिक रोखठोक व्हिजनचे संपादक सुरेश माडकर यांनी चार वर्षांपूर्वी कोल्हापूर येथून सुरू केलेल्या या वृत्तपत्राने अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या आणि जाहिरातींच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील निवडक व्यक्तींना या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समाजहिताची जाणीव ठेवून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोखठोक परिवाराच्या वतीने रविकिरण बळे यांना या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकज भिवटे, शिवराज नायकवडे, रोखठोक व्हिजनचे कार्यकारी संपादक सुरेश राठोड, उपसंपादक गुंडोपंत सुतार, निवासी संपादक डॉ. सुशील अग्रवाल तसेच राज्यभरातील मान्यवर आणि पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संपादक सुरेश माडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन पंकज भिवटे यांनी केले. हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक २७ मे २०२६ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला.

रविकिरण बळे यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे बळे कुटुंबीयांसह रुकडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles