24.3 C
New York
Saturday, June 13, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

आदर्श गुरुकुल विद्यालयाने सलग २१ व्या वर्षी राखली शंभर टक्के निकालाची परंपरा

आदर्श गुरुकुल विद्यालयातील यशवंत विद्यार्थी

 

पेठ वडगाव, प्रतिनिधी : येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने एस.एस.सी. दहावी बोर्ड २०२५-२६ परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची गौरवास्पद परंपरा कायम राखली आहे. सन २००५ पासून सलग २१ वर्षे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागत असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.

 

यंदा विद्यालयातील एकूण १९९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यामध्ये १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच ५७ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के, तर ७१ विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

 

गुणानुक्रमे वेदांत उमेश चव्हाण याने ९८.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वरित खंडू मोहिते (९४.०० टक्के) द्वितीय, तर श्रीशैल संदीप स्वामी (९३.४० टक्के) तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. पार्थ तेजस बुबनाळे (९३.२० टक्के), मयंक प्रशांत शेंडे (९२.८० टक्के), स्वरांजली रामचंद्र पाटील (९२.८० टक्के), सुमित माणिक जाधव (९२.६० टक्के), वेदांत भास्कर पाटील (९२.४० टक्के), श्रेयश जगन्नाथ वाघमोडे (९१.८० टक्के), सौगंधिक संदीप वंजाळे (९१.२० टक्के), आर्यन शिवाजी मोटे (९१.०० टक्के), तेजस प्रदीप गुरव (९०.८० टक्के), ओंकार लक्ष्मण महारनवर (९०.८० टक्के) व सर्वेश दीपक चौगुले (९०.४० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.

 

विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयात वेदांत चव्हाण याने ९५ गुण, हिंदी विषयात सुमित जाधव याने ९७ गुण, इंग्रजी विषयात वेदांत चव्हाण याने ९५ गुण, गणित विषयात वेदांत चव्हाण याने ९८ गुण, विज्ञान विषयात वेदांत चव्हाण याने ९६ गुण, तर सामाजिक शास्त्र विषयात श्रीशैल स्वामी याने ९७ गुण मिळवले.

या यशामागे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे, मुख्याध्यापक व्ही. एस. डोईजड, पर्यवेक्षक एस. जी. जाधव, प्रशासक एस. ए. पाटील तसेच ज्युनियर कॉलेज प्रशासक एस. एस. चित्ते वर्गशिक्षक  बी आर कांबळे,श्री पी एम गायकवाड व इतर सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles