ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव येथील गुणवंत विद्यार्थी
पेठ वडगाव, प्रतिनिधी : येथील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलने एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची गौरवास्पद परंपरा कायम राखली आहे. सन २००६ पासून सलग २० वर्षे विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागत असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा यंदाही अबाधित राहिली आहे.
यंदा विद्यालयातील एकूण ९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने पुन्हा एकदा शतप्रतिशत निकालाची नोंद केली. यामध्ये ०६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच ३० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक, ३५ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक, तर १९ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
गुणानुक्रमे हर्षिता अतुल पाटील हिने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सृष्टी महेश लोळगे (९४.८० टक्के) हिने द्वितीय, तर विघ्नेश दामू चव्हाण (९३.८६ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळवला. रविराज रामदास धागे (९१.०० टक्के), सिद्धी मिलिंद सूर्यवंशी (९०.४० टक्के), पृथ्वीराज रणजित साळोखे (९०.२० टक्के), ओम विलास रायकर (८९.४० टक्के), रुद्र दीपक रोंगे (८९.०० टक्के), ओम संजय जगताप (८८.८० टक्के), निकिता रामचंद्र पाटील (८८.२० टक्के) व वृशाली विजय कदम (८८.०० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. डी. एस. घुगरे , संस्थेच्या सचिव तथा गुरुकुलच्या मुख्याध्यापिका मा. सौ. एम. डी. घुगरे , ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे प्राचार्य मा. व्ही. एस. डोईजड , प्रशासक मा. एम. एच. चौगुले व सौ. एस. एस. गिरीगोसावी , वर्गशिक्षक मा. आर. ए. गायकवाड व सौ. आर. एम. सोळसे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.







