16.9 C
New York
Tuesday, March 31, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये क्वांटम 2 के 26’ उत्साहात संपन्न

तळसंदे- ‘कॉन्टम 2के 26’ च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. एस. आर. पावसकर, मयूर कलानी, प्रा. उमेश पाटील, प्रा. डॉ गुणाली दिवाण, प्रा. आर. एस. पवार, प्रा के. एम. पाटील आदी.

 

तळसंदे

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे क्वांटम 2 के 26 हा भव्य तांत्रिक महोत्सव उत्साहात संपन्न झाला. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरलेल्या या स्पर्धेत या स्पर्धेत राज्यातील ५० हून अधिक महाविद्यालयांमधील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला.

कार्यक्रमाचे उदघाटन टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस. आर. पावसकर व्ही.एम. के. थ्री डी स्टुडिओचे मालक मयूर कलानी यांच्या हस्ते झाले. डॉ. पावसकर म्हणाले, ‘क्वांटम 2 के– 26 हा महोत्सव विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांना चालना देईल. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी हा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. जे विद्यार्थी आपल्या कष्टावर विश्वास ठेवतात, ते निश्चितच यशस्वी होतात.

मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर आदी शहरांसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला.

यावेळी पेपर प्रेझेंटेशन, लेव्हल अप, पोस्टर प्रेझेंटेशन आय.पी.एल. ऑक्शन प्रोजेक्ट स्पर्धा क्लिक अँड फ्रेम ट्रेजर हंट ॲड-मॅड शो रोबो रेस बीजीएमआय अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व विजेत्यांना डॉ. सतीश पावसकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. उमेश पाटील यांनी केले. अकॅडेमिक डीन प्रा. आर. एस. पवार, असिस्टट रजिस्ट्रार जितेंद्र पवार, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रासयोच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles