16.9 C
New York
Tuesday, March 31, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

माथेरानमध्ये अनोख्या हळदी-कुंकू समारंभातून विधवा व तृतीयपंथीयांचा सन्मान

माथेरानमध्ये अनोख्या हळदी-कुंकू समारंभातून विधवा व तृतीयपंथीयांचा सन्मान

माथेरान (रायगड) – मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रात पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या परंपरेला सामाजिक जाणिवेची जोड देत माथेरान येथील मैत्री महिला ग्रुपतर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

दि. ३० मार्च २०२६ रोजी असेंब्ली हॉल येथे वर्षा शिंदे, रेखा चौधरी आणि वंदना लोटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विधवा महिलांसाठी विशेष तिळगूळ समारंभ घेण्यात आला. यावेळी त्यांचा सन्मान करून साडी वाटप करण्यात आले तसेच आनंदी व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे तृतीयपंथीय (किन्नर) समाजाचा सन्मान. अस्मिता फाउंडेशनच्या गुरूवार्य नीताजी केने यांच्या वाढदिवसानिमित्त सिमरन सिह, आरती विश्वकर्मा व राजो केने यांच्या उपस्थितीत तृतीयपंथीयांनाही सन्मानित करून समाजात समानतेचा संदेश देण्यात आला.

 

महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉद्वारे पाच विजेत्यांना प्रेशर कुकर भेट देण्यात आले. शीतल शिंदे व संगीता दाभेकर या खेळांमध्ये विजेत्या ठरल्या. गायिका गौरी कवठाणकर यांनी आपल्या सुरेल आवाजात उपस्थितांचे मनोरंजन केले.

या कार्यक्रमाला मनीषा शिंदे, सोनम दाभेकर, प्राची कदम, वनिता दिघे, तन्वी दाभेकर, गीता खाडे, रचना सावंत, हेमा सावंत, सुहासिनी दाभेकर, सुषमा जाधव, ज्योती सोनावणे यांसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे समालोचन मंगेश मोरे यांनी केले.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles