18 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रथमेश शिंदे यांचे लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण देशात ८१७ व्या रँक

प्रथमेशना त्यांच्या आई दिपाली शिंदे पेढा भरवताना ( छाया- शिवकुमार सोने)

मेहनत,जिद्द,कष्ट, चिकाटी व सातत्य यांवर माझा अटूट विश्वास आहे :प्रथमेश शिंदे

मजुरीची काम करणाऱ्या आई चा आनंद समोर आकाश ठेंगणे 

नवे पारगाव : नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथील प्रथमेश दिलीप शिंदे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.देशभरात ८१७ वी रँक मिळवून त्यांनी मोठा लौकिक प्राप्त केला आहे. घरची कौटूंबिक परिस्थिती अत्यंत बेताची व कमकुवत असतानाही आपले आजोळ इचलकरंजीतील मामा सोमनाथ कांबळे व आई दिपाली,वडील दिलीप शिंदे यांच्या पाठबळामुळे हे यश मिळाले असल्याचे प्रथमेशनी सांगितले.

प्रथमेश यांचे प्राथमिक ते बीएससी (केमिस्ट्री) पदवीपर्यंतचे शिक्षण रायगड उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर कॉलेज फुंडे, (जेएनपीटी) उरण येथे झाले. शिक्षण मुंबई येथे झालेनंतर २०२२ पासुन ते युपीएससी परिक्षेचा दिल्ली व मुंबई येथे सराव करीत असताना अखेर त्यांनी देशात ८१७ व्या रँकने हे यश मिळवले.यापूर्वि तीन वेळा त्यांचे हे यश हुकले होते.मात्र,कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचेच ही जिद्द व चिकाटी ठेवून त्यांनी अभ्यास करत परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली.

शुक्रवारी परीक्षेचा निकाल लागला.यामध्ये देशभरात ८१७ वे स्थान पटकावले,त्यामुळे आयआरएस अधिकारी म्हणून ते आता कार्यरत होणार आहेत.त्यांचे वडील दिलीप शिंदे यांना पॅरालिसीसचा सामना करावा लागला होता तर आई दिपाली या मजुरीची काम करत असताना कुटूंबात आर्थिक कमकुवतता असताना मामा सोमनाथ कांबळे व आजोळचे नातलगानी प्रथमेशला शिक्षण व त्याच्या यशासाठी कणखर पाठबळानी प्रथमेशना हे यश मिळाल्याने भरभरून त्यांनी आपल्या सोमनाथ कांबळे मामांप्रती बोलताना विशेष कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नवे पारगावचे विरधवल पाटील, इंजि.सुनील कांबळे, शेतकरी नेते वैभव कांबळे,शिवाजी आंबेकर,तानाजी तेली, माणिक कांबळे,अक्षय्य कांबळे, निवृत शिक्षक शिवाजी शिंदे आदी मान्यवरांचे हस्ते प्रथमेश यांचा विशेष हृद्य सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून प्रथमेश यांच्या प्रतिष्ठेच्या यशामुळे सध्या कोल्हापुर जिल्ह्यासह पारगांव पंचक्रोशीतून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

मेहनत,जिद्द,कष्ट, चिकाटी व सातत्य यांवर माझा अटूट विश्वास आहे,ज्यामुळे मला आपले ध्येय पूर्ण करण्यास नेहमीच मदत केली आहे व यापुढेही करत राहतील,अशी त्यांनी शेवटी प्रतिक्रिया दिली.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles