18 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात दंतविकृत्ती शास्त्र दिन उत्साहात साजरा

: दंतविकृत्ती शास्त्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करताना डॉ. शिल्पाताई कोठावळे डॉ. कौशल कोठावळे डॉ. सूर्यकांत मेटकरी.

 

नवे पारगाव | वार्ताहर

महाविद्यालयात दंतविकृत्ती शास्त्र दिन उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.दंतचिकित्साशास्त्रातील महत्त्वाची शाखा असलेल्या दंतविकृत्ती शास्त्राचे महत्त्व विशद करण्यात आले.दंतविकृत्ती शास्त्र व मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत मेटकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. शिल्पाताई कोठावळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य हरीष कुलकर्णी डॉ. अनिरुद्ध वरेकर व डॉ. कौशल कोठावळे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी भारतातील दंतविकृत्ती शास्त्राचे जनक डॉ. हरनाथ मनीष कुमार ढोलकिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. दंतविकृत्ती शास्त्र दिनानिमित्त रांगोळी, वॅक्स कार्व्हिंग, स्पेसिमेन सबमिशन, पेपर प्रेझेंटेशन, तंबाखूविरोधी रील स्पर्धा व क्विझ प्रोडिजी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रांगोळी स्पर्धेत कृष्णाली मनोरकर, कनिष्का म्हात्रे व भूमी शिरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. केस प्रेझेंटेशनमध्ये महेश्वरी जाधव प्रथम व वैश्णवी चौगुले द्वितीय . वॅक्स कार्व्हिंग स्पर्धेत समृद्धी राजकर प्रथम तर प्रज्ञा सलावडे द्वितीय ठरल्या. रील स्पर्धेत शैलेश माळी यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला. स्पेसिमेन सबमिशनमध्ये अश्विनी घोरपडे प्रथम ठरल्या. यावेळी सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार काजल बर्गे यांनी मानले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles