18 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत मागण्यांवर सकारात्मक चर्चा

सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत मागण्यांवर सकारात्मक चर्चा

शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांचे लवकर निर्णयाचे आश्वासन; गुणवंत शाळांचा सत्कार

 

मिरज (प्रतिनिधी) – सांगली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा सांगली येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत सन 2025-26 संच मान्यता दुरुस्ती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन थांबवणे, ऑनलाईन पर्यवेक्षण बंद करणे, प्रलंबित वेतन व पेन्शन प्रकरणे, अनुकंपा भरती, जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी, प्रलंबित मान्यता आदी विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

संघाचे अध्यक्ष संजयकुमार झांबरे व सचिव संतोष नाईक यांनी सर्व मागण्या शिक्षणाधिकारी श्री. राजेसाहेब लोंढे यांच्यासमोर मांडल्या. यावर शिक्षणाधिकारी लोंढे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 

यावेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी तसेच जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या अगस्ती विद्यालय, अगस्तीनगर या शाळांचा सत्कार करण्यात आला.

सभेला संघाचे उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles