22.4 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोल्हापूर जिल्ह्यातील ४१५५ शिक्षक-कर्मचाऱ्यांची ३५.४६ कोटींची फरक बिले मंजुरीच्या मार्गावर

माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचा पाठपुरावा

 

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार १५५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ३५ कोटी ४६ लाख ६५ हजार ९८० रुपयांची फरक बिले मंजुरीच्या मार्गावर आली आहेत. ही बिले २ फेब्रुवारी रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून पुढील अंतरिम मंजुरीसाठी ती शिक्षण संचालक, पुणे कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर रक्कम विविध वेतन फरकांशी संबंधित आहे. यात वरिष्ठ वेतन श्रेणी फरक, न्यायालयीन प्रकरणांतील बिले, महागाई भत्ता फरक, शिक्षण सेवकांचे एकूण पगार फरक, सहावा व सातवा वेतन आयोग फरक, पदोन्नती फरक, वार्षिक वेतनवाढ फरक, निवड श्रेणी फरक, चालू आर्थिक वर्षातील फरक तसेच निलंबित कालावधीतील फरक आदींचा समावेश आहे.

ही सर्व बिले वेळेत तयार करून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आली. यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. वेतन पथकाचे अधीक्षक उदयसिंगराव सरनाईक यांनीही प्रक्रियेला गती दिल्याची माहिती देण्यात आली.

४१५५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फरक बिले वेळेत सादर झाल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातून या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles