-9.5 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दैदीप्यमान यश

 

इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे पार पडल्या. तसेच 19 वर्षाखालील मुलींच्या गटातून लक्ष्मी अरुण सोनुले, अकरावी आर्ट्स हिची वाशिम येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणीसाठी निवड झाली.

 

या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर साहेब तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.

 

प्रशालेच्या मुख्याध्यापिका, ए. एस काजी मॅडम, उपमुख्याध्यापिका व्ही एस लोटके, उपप्राचार्य व्ही जी पंतोजी, पर्यवेक्षक श्री एस एस कोळी , पर्यवेक्षिका एन एम कांबळे,ज्येष्ठ शिक्षक श्री डी डी कोळी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

या तिन्ही संघांचे कोच शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेचया खेळाडूंना जिमखाना प्रमुख बी एस माने, क्रीडा शिक्षक के ए पाटील व व्ही के पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles