राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सामाजिक न्याय विभाग दौंड तालुका संघटक पदी सदाशिव रणदिवे यांची नियुक्ती
ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे यांची सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट दौंड तालुका संघटक पदी निवड करण्यात आली त्यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य या क्षेत्रामध्ये संस्थेच्या वतीने मोठे मोठे उपक्रम घेऊन संस्थेचे नाव दौंड तालुका व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्र मध्ये या संस्थेचा परिचय आहे याचा संपूर्ण अभ्यास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट दौंड तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग बी वाय जगताप सर यांनी या सर्व सामाजिक कामाचा विचार करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर श्री सदाशिव रणदिवे यांची दौंड तालुका सामाजिक न्याय विभाग संघटक पदी निवड करण्यात आली यावेळी दौंड तालुक्याचे मा. आमदार रमेश आप्पा थोरात मा.जिल्हा परिषद सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे दौंड तालुका अध्यक्ष नितीन दोरगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाच्या प्रवक्त्या वैशालीताई नागवडे यांच्या शुभहस्ते नियुक्त पत्र देण्यात आले या निवडीमुळे संपूर्ण दौंड शहर व तालुक्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे





