16.8 C
New York
Tuesday, March 31, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

२०१ दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप! ‘सावली’ आणि ‘भारत विकास परिषद’चा प्रेरणादायी उपक्रम

२०१ दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप! ‘सावली’ आणि ‘भारत विकास परिषद’चा प्रेरणादायी उपक्रम

कोल्हापूर (दिनांक: २८ ऑक्टोबर, २०२५): कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात ‘नवे पाऊल’ टाकण्यासाठी सावली केअर सेंटर, पिरवाडी आणि भारत विकास परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, अवयव मापन शिबिरामध्ये निवड झालेल्या २०१ दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत मॉड्युलर पद्धतीचे कृत्रिम अवयव (Artificial Limbs) प्रदान करण्याचा भव्य वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा महत्त्वाचा सोहळा गुरुवार, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ९ ते दोन या वेळेत सावली केअर सेंटर, पिरवाडी, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

या सेवाभावी कार्याला प्रशासकीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी श्री. अमोल येडगे (जिल्हाधिकारी, कोल्हापूर), श्री. योगेश कुमार गुप्ता (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर), श्री. एस. कार्तिकेयन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) आणि श्रीमती के. मंजुलक्ष्मी (आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी लाभार्थी आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था संस्थेतर्फे केली आहे. तसेच, बाहेरगावाहून येणाऱ्या दिव्यांग बांधवांना सीबीएस स्टँड पासून सावली संस्थेपर्यंत येण्या-जाण्याची मोफत व्यवस्थाही करण्यात आली आहे, मात्र त्यासाठी आगाऊ कल्पना देणे आवश्यक आहे. सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद यांनी उचललेल्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन, कोल्हापूर शहरातील सर्व समाजसेवी संस्था आणि समाजसेवकांनी या कार्यक्रमास उत्साहाने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (९०९६९५९७५१) या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles