-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

चर्मकार समाज वधू – वर सूचक मेळाव्याचे रविवारी आयोजन

चर्मकार समाज वधू – वर सूचक मेळाव्याचे रविवारी आयोजन.

कोल्हापूर – संत शिरोमणी रविदास संस्था आयोजित रेशीम बंध चर्मकार समाज वधू – वर सूचक मेळाव्याचे आयोजन रविवार दि. १२/ १०/ २०२५ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे दुपारी २.०० वाजता करण्यात आले आहे. अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक सुखदेव सुयवंशी यांनी दिली. या वधु – वर सूचक मेळाव्यास प्रमुख पाहुणे कोल्हापूरचे माजी उपमहापौर भूपाल शेटे, कोजिमाशि पतसंस्था संचालक अनिल चव्हाण, डॉ. वनिता शिंदे,डॉ. दगडू माने, शाम पाखरे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या वधु – वर सूचक मेळाव्याचा लाभ चर्मकार समाजातील इच्छूक मुला – मुलीनी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन रेशीमबंध वधु – वर सूचक मंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव कांबळे, सचिव चंद्रकांत कांबळे व मंडळाच्या सदस्यांनी केले आहे. इच्छूक वधु – वरांनी आपले फोटोसह बायोडाटे घेऊन यावे असे आयोजकांनी कळविले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles