पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा शिक्षक सन्मान सोहळा रद्द
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
दौंड – पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेला “गुणवंत शिक्षक सन्मान 2025” हा सन्मान सोहळा रद्द करण्यात आला आहे.
मराठवाडा व विदर्भातील पूरस्थितीमुळे शाळांमध्ये पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी–कष्टकरी वर्गाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अपरिमित हानीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पुढे ढकलून तो नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष हरेश ओझा यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाबाबतचे नियोजन काँग्रेस कार्यकर्ते दिगंबर पवार यांनी केले असून शिक्षक बंधु-भगिनींनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन मारूती पवार {बारामती लोकसभा शिक्षक काँग्रेस अध्यक्ष} यांच्या वतीने पण करण्यात आली आहे.
कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धोंडीबा तरटे, सौ. कल्पना शेरे, गुलाबराव नेटके व प्रा. सचिन दुर्गाडे (वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी) यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.





