पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
आज दिनांक 28-09-2025 रोजी दौंड शहर व तालुका स्तरीय स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले होते. सदर परीक्षा ही इयत्ता 5 वी ते 7 वि आणि 8वी ते 10वी अशा दोन गटात विभागली होती.दौंड शहर व तालुक्यातून अनेक इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला.भर पावसाचे वातावरण असतानाही 100% विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थी संख्या जास्त असल्याने मंगेश मेमोरियल स्कूल, दौंड आणि सिद्धेश्वर हायस्कूल व जुनिअर कॉलेज देऊळगाव राजे दौंड अशा दोन केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.
शिक्षण विभागातील तज्ञशिक्षकां कडून सदर पेपर ची योग्य तपासणी करून निकाल लावला जाईल व विजेता विद्यार्थ्यांना ठरविल्याप्रमाणे भव्य पारितोषिक दिले जातील असे प्रतिपादन ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव रणदिवे सर यानी केले. तसेच सदर परीक्षा व्यवस्थित पाडण्यासाठी श्री प्रणव मैराळ सर, वैशाली सदाशिव रणदिवे, प्रथमेश रणदिवे ,, आनंद बेलदार अजय बनसोडे निलेश कदम या मान्यवरांनीअथक परिश्रम घेतले





