नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात २८ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट, तर काही जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, जोरदार पावसाच्या सऱ्या आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता आहे.तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत जाईल. वाऱ्याचा वेग ५–७ मीटर प्रति सेकंद इतका असू शकतो.पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांतील शेतजमीन पाण्याखाली गेल्याची माहिती आहे.





