पारगाव: वार्षिक सभेत बोलताना संस्थापक शिवाजी सिद, सोबत बाबासाहेब मोरे, सुनिता सिद,पल्लवी चाळके व संचालिका मंडळ.
नवे पारगाव : पारगांव, ता.हातकणंगले येथील श्री ज्योतिर्लिंग महिला सहकारी दुध व्याव. संस्थेस अहवाल सालात २२ लाख २५ हजारांचा ढोबळ नफा झालेची व म्हैस दुध सभासदास ६ टक्के व गाय दुधास ५.५० टक्के संस्था रिबेट देणार असुन याशिवाय वारणा दुध संघाकडून मिळणारे म्हैस व गाय दुधाचे जादाचे रिबेट सभासदांना वेगळे जसेच्या तसे मिळणार असलेची माहिती संस्थापक व माजी हातकणंगले पंचायत समिती सदस्य शिवाजी सिद यांनी संस्थेच्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पारगांव पाराशर विकास सेवा संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेतर्फे पुढील आर्थिक अहवाल सालापासुन जास्तीचा गाय व म्हैस दुधपुरवठा करणारे सभासदांना यापुढे त्यांना मिळणाऱ्या जास्तीचे दुध रक्कमेवर नंबर्स काढले जाणार आहेत यासाठी सभासदानी संस्थेकडे जास्तीत जास्त उत्कृष्ट फॅट व एसएनएफ युक्त स्वच्छ दुध पुरवठा करण्याचे अवाहनही शिवाजी सिद यांनी केले.
संस्थेकडे जास्त दुध पुरवठा करणारे सभासद पुढील प्रमाणे- जुने पारगांव शाखा नंबर एक : गायदुध- शिवाजी बंडगर (प्रथम),पोपट इरकर (द्वितीय),लक्ष्मी साखळकर (तृतिय). म्हैसदुध- हसमत शिगावे (प्रथम),कोमल बंडगर (द्वितीय),अक्षय लोखंडे ( तृतिय).बिरदेव नगर शाखा नंबर दोन : गाय दुध- राहुल कृष्णात मोरे (प्रथम),सुनिता सिद( द्वितीय),राहुल प्रकाश मोरे (तृतिय). म्हैसदुध- तागाबाई बोडके (प्रथम),पंडीत यादव (द्वितीय),देवजी बोडके (तृत्तीय).नंबर मध्ये आलेले सभासद यांना रोख बक्षिसे देऊन व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सभेचे विषयवाचन सचीव नितीन घुगरे यांनी केले. पाराशर विकासचे चेअरमन बाबासाहेब मोरे,मंत्रालयीन सहाय्यक शुभदा पाटील यांची भाषणे झाली.
सभेसाठी पाराशर विकास संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मोरे,नवे पारगांवचे माजी सरपंच संभाजी चरणे,रामचंद्र पाटील,शेतीपुरकचे चेअरमन प्रकाश मोरे, माजी केंद्रप्रमुख बाबासो सिद,सचीन हुजरे, हिंदुराव मोरे,चेअरमन सुनीता संभाजी सिद,व्हा.चेअरमन पल्लवी चाळके, संचालिका शकुंतला कुंभार,करुणा चाळके, अर्चना लोखंडे,दिपाली सिद,उज्वला इरकर, वैशाली पाटील,अनिता डोइजड,अलका पोवार, सुनंदा पोवार यांच्यासह सभासद,कर्मचारी उपस्थित होते.स्वागत संस्थेच्या चेअरमन सुनीता सिद यांनी केले तर प्रास्ताविक व आभार बाबासो सिद यांनी मानले.






