प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांचे नाव चित्रपटसृष्टीतील असंख्य कलाकारांशी जोडले गेले. या यादीत संजय दत्तचाही समावेश आहे. अभिनेत्री नर्गिस दत्त यांनी रेखावर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या चित्रपटांनी आणि शैलीने इंडस्ट्रीमध्ये एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. लोक अजूनही त्यांचे चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. तथापि, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतरही, रेखा यांचे वास्तविक जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची चर्चा अजूनही सुरूच आहे. अमिताभ बच्चन यांच्या पलीकडे, रेखा यांचे नाव अनेक बॉलिवूड स्टार्सशी देखील जोडले गेले आहे. यामुळे रेखा यांना अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले आहे.
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे नाव अनेक दिग्गज कलाकारांशी जोडले गेले होते. यापैकीच एक किस्सा अभिनेता संजय दत्त यांच्याशी संबंधित आहे, ज्यामुळे संजय दत्त यांची आई आणि लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस दत्त यांनी रेखावर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला होता.
रेखा आणि संजय दत्तच्या जवळीकतेची चर्चा
रेखा आणि संजय दत्त यांनी ‘जमीन आकाश’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुजबूज बॉलिवूडमध्ये पसरली. या अफवा इतक्या वाढल्या होत्या की, रेखा संजय दत्तच्या नावाने सिंदूर लावत असल्याचा दावा केला गेला. या विषयावर रेखा आणि संजय दोघांनीही मौन पाळले असले तरी, संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांचा पारा चांगलाच चढला होता.
नर्गिस दत्त यांचे खळबळजनक वक्तव्य
रेखावरील राग नर्गिस दत्त यांना सार्वजनिकरित्या आवरता आला नाही. १९७६ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी रेखाबद्दल थेट आणि अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले. नर्गिस दत्त म्हणाल्या होत्या की, “ती (रेखा) पुरुषांना असे संकेत देते की जणू ती त्यांच्यासाठी सहज उपलब्ध आहे. काही लोकांच्या नजरेत ती एखाद्या चेटकीणपेक्षा कमी नाही.” पुढे त्या असेही म्हणाल्या होत्या की, रेखाला मानसिक आजार आहेत आणि तिला एका आधार देणाऱ्या कणखर पुरुषाची गरज आहे.
गुपचूप लग्नाच्या अफवा आणि खंडन
रेखा आणि संजय दत्त यांनी याच काळात गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या त्यावेळी पसरल्या होत्या. मात्र, रेखाचे चरित्र लिहिणारे लेखक यासेर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात हे दावे स्पष्टपणे नाकारले. संजय दत्तनेही एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रेखासोबतच्या आपल्या नात्यातील बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगितले होते.
‘नॅशनल व्हँप’ चा टॅग आणि दुर्दैवी अंत
रेखाचे लग्न दिल्लीतील उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी झाले होते. तथापि, १९९० मध्ये मुकेश अग्रवाल यांनी पत्नीच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर रेखाचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. लोकांना त्यांच्या हत्येसाठी रेखालाच जबाबदार धरले आणि तिच्यावर ‘व्हँप’ असल्याचा आरोप लावला गेला. अनेकांच्या संसार उद्ध्वस्त करण्यासाठी आजही रेखाला जबाबदार धरले जाते. नर्गिस दत्त यांचा रेखावरील हा किस्सा आजही अनेक ठिकाणी चर्चेत असतो.





