या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशविरोधात रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानचा संघ आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
दरम्यान, अशा विजयामुळे आमचा संघ ‘खास’ असल्याचा विश्वास वाटतो, असं पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर म्हटलं आहे.
फायनलमध्ये भारतासह कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद पाकिस्तानमध्ये आहे, असं आगाने यावेळी म्हटलं.
सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, “असे सामने आम्ही जिंकत गेलो तर नक्कीच आमची टीम खास आहे. सगळ्यांनी चांगला खेळ केला. फलंदाजीमध्ये अजून सुधारणेची गरज आहे, पण त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.”
रविवारी (28 सप्टेंबर) दुबईत आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत.
या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनवेळा आमनेसामने आले आहेत. एकदा ग्रुप सामन्यात आणि दुसऱ्यांदा सुपर 4 मध्ये.
दोन्ही सामन्यांत भारताचं पारडं जडच राहिलं. दोन्ही सामने भारताने जिंकले.
भारताविरुद्धच्या फायनल सामन्यावर पाकिस्तानच्या कर्णधार सलमान अली आगाने सांगितलं, “आम्ही खूप उत्साहित आहोत. आम्हाला काय करायचं हे माहीत आहे. आमची टीम इतकी मजबूत आहे की, आम्ही कोणालाही हरवू शकतो. रविवारी त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही मैदानात उतरू.”
‘आम्ही तयार आहोत’
सलमान अली आगाने शाहीन शाह आफ्रिदीचं खास कौतुक केलं. आफ्रिदीने आपला अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळवला.
आगाने सांगितलं, “शाहीन एक खास खेळाडू आहे. तो नेहमी टीमला जे हवं ते करतो. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. आम्ही 15 धावांनी मागे होतो, सुरुवातीला आम्ही चांगली गोलंदाजी करून दबाव निर्माण केला. नवीन बॉलने चांगली गोलंदाजी केली. जेव्हा तुम्ही अशी गोलंदाजी करता, तेव्हा सामना नक्की जिंकता येतो.”
तो पुढे म्हणाला, “आम्ही फील्डिंगही चांगली करत आहोत. यासाठी अतिरिक्त सराव करतो आहोत.





