बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके, मुख्य सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या जागतिक दर्जाच्या विकासाला मंजुरी
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथील विधानभवन स्थित मंत्री परिषद सभागृहात शिखर समितीची बैठक झाली. यामध्ये स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ (तुळापूर) आणि समाधी स्थळ (वढू बुद्रुक) यांच्या सुधारित विकास आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली.
राज्य सरकारने स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याचा आदर करत जागतिक दर्जाचे प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य, त्याग आणि पराक्रमाचा इतिहास सर्व जनतेपर्यंत व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा याचा याचा मुख्य उद्देश आहे.
नव्या सुधारित आराखड्यानुसार भीमा नदीवरील तुळापूर-आपटी येथे पूल बांधणे आणि आपटी-वढू (बु.) रस्त्याचे रुंदीकरण, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, 82 आसनी क्षमतेचा 10 डी शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, 350 मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू, समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, 120 मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृह, भीमा नदीवरील पुलावर 12 मीटर रुंदीची ‘विविंग गॅलरी’, तुळापूर वढू बुद्रुक येथे 100 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना.आदी कामांचा समावेश आहे.





