गांधीनगर मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीला शिस्त लावण्यासाठी गांधीनगर ट्रान्सपोर्ट ऑल गुड्स असोसिएशनचा पुढाकार:
पोलीस प्रशासन आणि व्यापारी असोसिएशन यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
गांधीनगर मुख्य रस्त्यावरील विषेता: ट्रान्सपोर्ट लाईनची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गांधीनगर ट्रान्सपोर्ट ऑल गुड्स असोसिएशन ने पुढाकार घेऊन वाहतुकीला स्वयमशिस्त लावण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनेक कारणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट लाईनला वाहनांच्या बेसिस्त पार्किंग मुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशने ट्रान्सपोर्टधारक यांच्यात समन्वय बैठक घेऊन सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर होलसेल व्यापारी असोसिएशन, तसेच गांधीनगर पोलीस प्रशासन यांनाही वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी संदर्भात कळवून खालील प्रमाणे नियमावली तयार केली आहे.
सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ट्रान्सपोर्ट धारकांनी लोडिंग साठी गाडी दारात लावू नये. बुकिंग टाइमिंग सायंकाळी ६:३० पर्यंतच राहणार आहे. सायंकाळी ७ नंतर येणाऱ्या बुकिंगवर प्रति डाग २०० रुपयांचा दंड ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे आकारला जाईल. सायंकाळी ५ ते ९ या वेळेत अवजड कंटेनर किंवा अवजड वाहन मुख्य रस्त्यावरून तसेच ट्रान्सपोर्ट लाईन येथे वाहतूक केल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून १००० रुपयाचा दंड आकारला जाईल. अशी नियमावली तयार केली आहे.
दरम्यान वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केलेल्या नियमावलीला पोलीस प्रशासनाने आणि होलसेल असोसिएशनने सहकार्य करावे अशी भावनाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या बैठकीस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आयुब मुजावर, सेक्रेटरी विलास पाटील, खजानिस संतोष तावडे, सदस्य सचिन चौगुले, विक्रम शिंदे, ज्ञानदेव शिंदे, बाळासो भोसले, अनुप महाजन, इब्राहिम मनेर, आदी उपस्थित होते.





