गोपाळवाडी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र सोनवलकर तर उपाध्यक्षपदी सदाशिव रणदिवे : बिनविरोध निवड
पुणे (प्रतिनिधी) – आदर्श ग्रामपंचायत गोपाळवाडी गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निर्भीड पत्रकार राजेंद्र मनोहर सोनवलकर यांची, तर उपाध्यक्षपदी सदाशिव रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतच्या कार्यक्षम सरपंच स्वाती राजू पवार यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या ग्रामसभेमध्ये ही निवड सर्वानुमते पार पडली.
नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र सोनवलकर म्हणाले, “गोपाळवाडी हे आदर्श व तंटामुक्त गाव म्हणून ओळखले जाते. गावातील तंटे गावातच सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मी आतापर्यंत काम केले असून पुढेही हे कार्य अधिक गतीने सुरू राहील.”
या वेळी ग्रामपंचायत अधिकारी झुंबर होळकर, उपसरपंच मनिषाताई भोसले, माजी सरपंच गोरख होले, वैशालीताई शिंदे, रोहिणीताई शिंदे, जयसिंग दादा दरेकर, माजी चेअरमन बाळासाहेब गिरमे, शांताराम होले, माजी उपसरपंच प्रवीण होले, प्रकाश गिरमे, शरद होले, सुरज भुजबळ, पोलीस पाटील वर्षाताई लोणकर, राजू पवार, विजय लव्हे, शिवाजी दरेकर, रघु सुळ, विजय होले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन गायकवाड, निलेश शेंडे, डॉ. दत्तात्रय जगताप, अॲड. किशोर टेकावडे, अक्षय भोसले, लखन शेंडे, आप्पा पवार, गणेश चोरमले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





