१७ वर्षाखालील विभागीय क्रिकेट स्पर्धेत चावराई माध्यमिक विद्यालय उपविजेते
फोटो ओळी:
सातारा: येथे झालेल्या १७ वर्षाखालील मुले विभागीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळालेल्या संघासोबत जिल्हा क्रिडाधिकारी नितीन तारळकर, क्रिडाधिकारी स्नेहल शेळके, विद्यालयाचे प्रशिक्षक रोहीत डंबे, ए. वाय. पाटील, माने आदी.
नवे पारगाव, ता.२७: सातारा येथील जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रिडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील मुले विभागीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयाच्या संघाने उपविजेते पटकाविले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परीषद व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूरच्यावतीने सातारा येथे १७ वर्षाखालील मुले गटाच्या विभागीय स्पर्धा आज झाल्या. अंतिम सामना सातारा विरुध्द चावराईमध्ये होऊन हा सामना साताऱ्याने जिंकला. त्यामुळे चावराई विद्यालयाला उपविजेतेपद मिळाले.
चावराई संघात
या खेळांडूचा समावेश होता.
या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक रोहित डंबे,तसेच सुरज पाटील, ए. वाय. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, शिक्षकांचे मार्गदर्शन तर हातकणंगले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, वारणा बॅंकेचे माजी संचालक माणिकराव निकम, सार्वजनिक बांधकामचे निवृत्त शाखा अभियंता एम. आर. पाटील यांच्यासह संचालकांचे प्रोत्साहन मिळाले.
विजेत्या संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे- कर्णधार वेदांत पाटील, उपकर्णधार आदित्य जाधव, संस्कार सोने, श्रावण देसाई, मंथन पाटील, सिद्धार्थ कुंभार, विआन उर्फ राज मोहिते, आयुष्य मुंगारे, ओम पाटील, हर्षवर्धन पायमल,
शंतनू पाटील, ऋषभ चव्हाण, अभिषेक पाटील, साईनाथ निकम, पृथ्वीराज जाधव.





