जुने-नवे पारगाव- बहिरेवाडी परिसरात बिबट्याचा वावर
नवे पारगाव : वारणा दुध संघाच्या पशुखाद्य व वॅप्कॉस आईस्क्रिम फॅक्टरी परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वारणा दुधचे सिक्युरिटी सुपरवायझर कृष्णात पाटील यांना पेट्रोलिंग दरम्यान मोकळ्या माळावरून बिबट्याचा वावर आढळून आल्याने पाटील यांनी त्याचा मागोवा घेतला असता सदर बिबट्या हा पिछाडीस असणारे वसंत पाटील यांचे हत्तीगवत असणारे शेतात जाताना आढळल्याने सदर घटनेची खबर त्यांनी आपले वरीष्ठ सिक्युरिटी अधिकारी बाबुराव माने यांना दिलेवरून माने यांनी याबाबत जुने पारगावचे सरपंच तुकाराम पोवार यांना कळवले.सरपंच पोवार यांनी नरंदे वनक्षेत्राचे वनपाल कुंडलीक कांबळे याना ही घटना कळवली.परीसरात बिबट्या वावरामुळे शेतकरी- नागरीकांतुन भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान वनपाल कांबळे यांनी वनरक्षक श्रध्दा सोनटक्के यांना सदर बिबट्याची माहिती घेण्यास सांगितले असता गुरुवारी दिवसभरात सोनटक्के यांनी वॅप्कॉसचे पिछाडीस असणारे शेतवडीमधुन बिबट्याचा शोध घेतला असता पाणी पाजलेल्या ऊस शेतीत सदर बिबट्याच्या पायांचे ताजे ठसे आढळून आलेचे सांगितले तर पारगांव जंगल परीसरातील नाथा मारूती मळा परिसरातही त्यांना बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे आढळून आल्याने नवे-जुने पारगांव, बहिरेवाडी परिसरात बिबट्याचा वावर स्पश्ट झाला असल्याने येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून सरपंच तुकाराम पोवार, वर्षाराणी देशमुख यांनी येथील नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे,यावेळी उपस्थित शेतकरी नागरीकांना वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी संभाव्य परिस्थितीत बिबट्या आढळून आल्यास त्यावेळचे परिस्थितीवरील उपाययोजनांची माहिती पत्रकांचे वाटप केले.





