-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोल्हापूरमध्ये बिबट्याची दहशत; वूडलँड हॉटेल परिसरात थरार!

कोल्हापूरमध्ये बिबट्याची दहशत; वूडलँड हॉटेल परिसरात थरार!

कोल्हापूर: कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात बिबट्या शिरल्याने मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर २०२५) मोठी खळबळ उडाली. उच्चभ्रू वस्तीत असलेल्या वूडलँड हॉटेलच्या गार्डनमध्ये बिबट्याने अचानक प्रवेश केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने हॉटेलमध्ये काम करत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, ज्यात ते किरकोळ जखमी झाले. यानंतर बिबट्याने हॉटेलमधून बीएसएनएल कार्यालयात उडी घेतली आणि पुढे महावितरण कार्यालयाच्या एका चेंबरमध्ये आश्रय घेतला.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला, ज्यात ते जखमी झाले.

वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करत आहेत. शहराच्या मध्यभागी बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बिबट्याला पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. शहरात पुन्हा एकदा बिबट्याची एन्ट्री झाल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles