कोल्हापूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न
सत्याचा शिलेदार न्यूज नेटवर्क
कोल्हापूर – खासदार क्रीडा महोत्सवाच्या उपक्रमांतर्गत आयोजित सांसद खेल महोत्सव आणि कोल्हापूर सिटी अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग खेळाडूंचा सन्मानही करण्यात आला.
या स्पर्धेत २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपली जिद्द, कौशल्य आणि शिस्त दाखवली. बॉक्सिंग हा फक्त शारीरिक ताकदाचा खेळ नसून, मानसिक शिस्त, चपळता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते. यामुळे खेळाडूंमध्ये आत्म-संरक्षणाचे कौशल्येही विकसित होतात.
स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले मोटे स्पोर्ट्स अकॅडमी, वसगडे या अकॅडमीच्या खेळाडूंनी, द्वितीय स्थान मिळाले द बॉक्सिंग क्लब, हुपरी आणि तृतीय स्थान मिळाले छत्रपती बॉक्सिंग क्लब, बावडा या अकॅडमीच्या खेळाडूंनी. सर्व विजयी व सहभागी खेळाडूंना अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धा आयोजनासाठी कोल्हापूर सिटी अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्या सचिव आरती कामटे मॅडम, सहसचिव मनोहर घाडगे सर, तसेच यशवंत हिरुर, उमेश पाटील, महादेव कदम, प्रशांत मोटे, भारत सरगले, स्तवन सोरटे, गौरव जाधव, समर्थ कामटे, आदित्य जाधव आणि युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजीत पवार यांनी मेहनत घेतली.
याप्रकारच्या उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे, आणि आगामी काळात युवा खेळाडूंमध्ये उत्साह व भागीदारी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





