ईगल फाऊंडेशनचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आष्टा (ता. वाळवा) – ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलात भव्य ‘गुणगौरव सोहळा’ अत्यंत उत्साहात पार पडला. सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री दादा इदाते होते. यावेळी माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सौ. संगिता शिंदे, दै. रोखठोक चे संपादक सुरेश माडकर, कार्यकारी संपादक सुरेश राठोड, तसेच डॉ. शंकर अंदानी, काकासाहेब देशमुख, शिरीष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. शंकर अंदानी लिखित “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी : एक शोध” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
फाऊंडेशनच्या सकारात्मक, विधायक आणि सातत्यपूर्ण कार्याचा सर्व मान्यवरांनी गौरव केला. यावेळी पद्मश्री दादा इदाते, डॉ. अण्णासाहेब डांगे, सुरेश राठोड, व सुर्यकांत तोडकर यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्रा. महेश मोटे यांनी आभार मानले. प्रभावी सूत्रसंचालन पोपट काटकर यांनी केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील पुढील मान्यवरांचा मानपत्र, सन्मानचिन्ह व मानाचा फेटा देऊन गौरव करण्यात आला.संजय जाधव, गोपाल भावसार, अस्लमभाई सय्यद, ॲड. प्रमोद भोकरे, डॉ. राजेंद्र कवठेकर, तुकाराम बंडगर, स्वाती बंडगर, पत्रकार युवराज निकम, पत्रकार चंद्रकांत गुरव, प्रताप शिरतोडे, अशोक पाटील, महेंद्र निकम, डॉ. दिलीप गाडे, अशोक गोरड, हिराकांत गाडेकर, प्रा. दिलीप बरकडे, केदार भस्मे, प्रा. विशाखा साटम, सौ. राधिका भावसार, प्राचार्या यशोदा नाईक, सुरैय्या सैय्यद जिलानीपाशा जाहागिरदार, शैला बैसाणे, अर्चना डाके, लिना पांडे, प्रतिभा थोरात, प्रा. रेखा कटके, सौ. गायत्री मोहाडीकर, सौ. सुनिता गढळे, प्रा. लहूकुमार थोरात, प्रा. सोमनाथ लांडगे, रावसाहेब मुरगी, प्रदीप खोत, प्रा. राम घुले, सुदाम धाडगे, संभाजी माळी, प्रा. संजय लेनगुरे, आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, संजय कात्रट, राजकुमार कांबळे, शाहीर श्रीपती नांगरे, ॲड. दामोदर कोंडे, डॉ. गौरव पाटील, निवृत्ती जाधव, अमृत गोळे, नितीन ओहाळ, मोहन बागमार, पोपट काटकर आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाबासाहेब राशिनकर, अभिजित पाटील, अशोक शिंदे, संजय गायकवाड, दिनेश कांबळे, दिपक पोतदार, प्रा. दिलीप जाधव, प्रकाश वंजोळे, प्रा. विजय जगताप, संजय थोरात, सतिश भोसले, डॉ. शिवप्रसाद कनाडे आदींनी परिश्रम घेतले.





