-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

चावराईच्या विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा आनंद १६ पक्षांनी दिले दर्शन

चावराईच्या विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा आनंद १६ पक्षांनी दिले दर्शन

 

 

नवे पारगाव, ता. ८: पक्षी सप्ताहानिमित्ताने महाराष्ट्र पक्षी संघटनेच्यावतीने चावरे येथील चावराई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ पक्षी निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना दुर्बिनद्वारे ग्रे हेराॅन, खंड्या, कोतवाल, धोबी, पानकावळा यांसह विविध पक्षांचे दर्शन झाले.

प्रतिवर्षाप्रमाणे पक्षी सप्ताह निमित्ताने चावरे येथील वारणा नदीकाठी चावराई माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पक्षीमित्र युवराज पाटील यांनी दुर्बिण द्वारे पक्षाचे निरीक्षण करुन त्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी पक्ष्यांचा आधीवास, मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचा आधीवासावरती होणारा अनिष्ट परिणाम, पक्ष्यांची घटणारी संख्या, चोरटी शिकार, पक्ष्यांचे स्थलांतर आदी विषयी मार्गदर्शन श्री. पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. पाटील यांनी उत्तरे दिली‌.पक्षीनिरिक्षणादरम्यान सोळा प्रकारचें पक्षी दिसले यामध्ये स्थानिक पक्ष्यांच्यामध्ये सामान्य गप्पिदास, माळटिटवी, वेडा राघू, लहान बगळा, करडा धोबी, पांढरा धोबी, नदिसुरय, कोतवाल, सातभाई (बॅबलर), मोठा खंड्या, ग्रे हेरॉन, पाँड् हेरॉन, भांग पाडी मैना, रेड मुनीया, पान कावळा आदी पक्षी पाहायला मिळाले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, ए. व्ही. वळगड्डे, एस. ए. पाटील, एन. व्हीं. बिडकर, जे एस कुंभार, एम. एस. धोंगडे, ए. वाय. पाटील, टी .आर.पाटील, ए.पी.पाटील, डी. ए. पाटील उपस्थित होते.

—–

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles