रुकडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी पाकीजा मुल्लानी यांची बिनविरोध निवड
रुकडी (ता. हातकणंगले), दि. ६ (प्रतिनिधी) — रुकडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पाकीजा राज मुल्लानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतच्या कै.खा. बाळासाहेब माने सभागृहात पार पडली. निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून सरपंच सौ. राजश्री संतोष रुकडीकर यांनी काम पाहिले.
मावळत्या उपसरपंच सौ. मालती इंगळे यांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच मार्गदर्शक खासदार धैर्यशील माने यांचे आभार मानले.
नवोदित उपसरपंच पाकीजा मुल्लानी यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “खासदार धैर्यशील माने यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन.”या निवड प्रक्रियेसाठी खासदार धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी ग्रामसेवक अजय वाघ, ग्रामपंचायत सदस्य शितल खोत, शमूवेल लोखंडे, राजकुमार मोहिते, राहुल माने, सिकंदर पेंढारी, शंकर मुरूमकर, श्वेता दाभाडे, शोभा कोळी, अश्विनी सुतार, अश्विनी इंगळे, वनिता गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष रुकडीकर, दिलीप इंगळे, राज मुल्लानी, राजू सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.





