-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

विनोदाचा बादशहा हरपला! ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे ७४ व्या वर्षी निधन; कलाविश्वावर शोककळा

विनोदाचा बादशहा हरपला! ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे ७४ व्या वर्षी निधन; कलाविश्वावर शोककळा

मुंबई: आपल्या विनोदी अभिनयाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे आज (२५ ऑक्टोबर २०२५) दुपारी अडीच वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘इंद्रवदन साराभाई’ ही भूमिका आणि ‘जाने भी दो यारो’, ‘मै हूँ ना’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते.
चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी (२६ ऑक्टोबर २०२५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने एका हरहुन्नरी कलाकाराला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles