-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जगभरात कर्तृत्ववान ठरतील: उत्तम फराकटे

शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी जगभरात कर्तृत्ववान ठरतील: उत्तम फराकटे

युवा महोत्सवातील विजेत्यांचा उद्योजक उत्तम फराकटे यांच्या हस्ते सत्कार

तिटवे प्रतिनिधी: शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आत्मविश्वासू, जिद्दी, मेहनती आणि कलागुणांनी परिपूर्ण असून त्या जगभरात आपले कर्तृत्व सिद्ध करतील, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध उद्योजक आणि लेखक उत्तम फराकटे यांनी काढले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवात (युथ फेस्टिवल) प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी या वेळी बोलताना विद्यार्थिनींनी केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करावे आणि महाविद्यालयाचे नाव उजळवावे, असे आवाहन केले. ‘कॉलेज जीवन हा केवळ अभ्यासाचा काळ नसून, तो स्वतःला शोधण्याचा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रवास आहे,’ असेही ते म्हणाले.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या प्रादेशिक युवा महोत्सवात शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी २६ हून अधिक कलाप्रकारांमध्ये भरघोस यश संपादन केले. तसेच, मध्यवर्ती युवा महोत्सवातही त्यांनी १५ हून अधिक कलाप्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या कामगिरीमुळे शहीद महाविद्यालयाने प्रादेशिक युवा महोत्सवात लिटरेचर, डान्स आणि थिएटर इव्हेंट्समध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवली, तसेच मध्यवर्ती युवा महोत्सवातील लिटरेचर इव्हेंटमध्येही जनरल चॅम्पियनशिप पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढवला. यासोबतच, एस.एन.डी.टी. आयोजित क्रीडा महोत्सवात खो-खो या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. प्रा. दिग्विजय कुंभार यांनी समन्वयक म्हणून प्रभावी भूमिका पार पाडली, तर प्रा. तेजस्विनी यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. शुभांगी भारमल यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी सूर्यकांत जांभळे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. सिद्धता गौड यांच्यासह शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles