एबीपी शिक्षण समूहाचे मैदानी जिल्हास्तर स्पर्धेमध्ये उज्वल यश
नवे पारगाव – वारणानगर या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये एबीपी शिक्षण समूहाच्या वारणा विद्यानिकेतन व आबासाहेब पाटील जुनियर कॉलेज ऑफ सायन्स नवे पारगाव च्या खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले, सदस्य स्पर्धेमध्ये एकूण 13 सुवर्णपदक व 2 रौप्य पदक व 5 कास्यपदक अशा एकूण 20 पदकांची कमाई केली. सदर स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले 100 मी धावणे , 200 मी धावणे, 80मी हर्डल्स, रिले या क्रीडा प्रकारात कु श्रीवर्धन चंद्रकांत जाधव या खेळाडूंने 4 सुवर्णपदक प्राप्त केले. सुवर्णपदक प्राप्त खेळाडू -आयुष पाटील,अनुराग सुतार, श्रीवर्धन जाधव, दिवेश कसोटे, स्वरूप कापरे, वेदांत कदम, श्रीयश भुसारी, वेदांत पवार,पृथ्वीराज यादव, रौप्य पदक प्राप्त खेळाडू- पार्थ माने, अथर्व पवार, कांस्यपदक प्राप्त खेळाडू -अथर्व पवार, पार्थ माने, मुजजमील फरास, आयुष पाटील, वेदांत ठोंबरे
यशस्वी सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सतीश पाटील, प्रशिक्षक सुरेश जमदाडे, प्रशिक्षिका संगीता सकटे, प्रशिक्षक चिराग बाबर, क्रीडा प्रमुख गोरक्ष सकटे यांचे मार्गदर्शन लाभले,
सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांना संस्थेचे अध्यक्ष ए बी पाटील सर, सचिव अमोल कुमार पाटील, सचिवा राजलक्ष्मी पाटील, संचालिका आकांक्षा पाटील ,प्राचार्य एस आर पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.






