-10.2 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी भाषा ही महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये जपणारी : मा. श्री. विठ्ठल मोहिते

मराठी भाषा ही महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये जपणारी : मा. श्री. विठ्ठल मोहिते

मिरज:- संजय पवार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही खूप मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे. भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन केले जाते. मराठी भाषेचा जन्म दोन हजार वर्षांपूर्वीचा असून मराठी लोकसाहित्य व लिखित साहित्याची समृद्ध अशी परंपरा आहे. चाकाचा शोध लागला व जात्यातून पीठ पडू लागले तेव्हा स्त्रियांच्या भाव-भावना जात्यावरील ओव्यातून अभिव्यक्त होऊ लागल्या. असे मा. श्री. विठ्ठल मोहिते (अध्यक्ष- सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ) यांनी मत प्रतिपादन करून, मराठी भाषेतील शिलालेख, ताम्रपट व प्राचीन साहित्याचा आढावा घेतला.

ते येथील श्री गुजराती सेवा समाज संचलित, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ निमित्त आयोजित केलेल्या भित्तिपत्रक उद्घाटन व विशेष व्याख्यानप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांनी केले. प्रा. श्रीमती साजिदा आरवाडे यांनी पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन केले.

पुढे मा. श्री. विठ्ठल मोहिते यांनी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा आढावा घेतला व महिलांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच मराठीतील नामवंत कविंच्या कवितांचा आस्वाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एल. आर. पाटील हे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास होतो व एक हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळते. असे मत व्यक्त करून अभिजात मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्रीमती साजिदा आरवाडे यांनी मानले याप्रसंगी मराठी विभागातील प्रा. श्रीमती एस. ए. हेरवाडे, प्रा. श्रीमती आर. एस. सावगावे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles