अर्जुननगर : विजेत्या संघाला पुरस्कार प्रदान करताना विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव डॉ. निलेश पाटील व मान्यवर. सोबत व्ही. बी. उतळे
डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुलींची आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
तळसंदे :
कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद अंतर्गत शिवाजी विदयापीठ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या मुलींच्या संघाने चौथे स्थान मिळवले आहे. वेणूताई चव्हाण महाविद्यालय कराड येथे होणाऱ्या अंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे.
देवचंद कॉलेज अर्जुननगर, निपाणी येथे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत देवचंद कॉलेज, डीकेटीइ इचलकरंजी, शिवराज गडहिंग्लज ,विवेकानंद कॉलेज कोल्हापूर , डी वाय पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगर , डी. आर.एम कागल, सि.एन.सि .व्ही कोल्हापूर, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे आदी संघानी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेमध्ये डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत चौथे स्थान मिळवेल आहे.
या यशामुळे आंतरविभागिय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील , उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील , विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांनी यशस्वी खेळाडू, जिमखाना प्रमुख व्ही. बी. उतळे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.





