दीपावलीसाठी कोजिमाशि पतसंस्थेची भेटवस्तू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, शाहुपुरी शाखेने या दीपावलीसाठी सभासदांना १० लिटर स्टार ब्रँडचे सूर्यफुल तेल आणि कॉफी कप बॉक्सचे वितरण केले. हे स्वागतार्ह उपहार शाखा चेअरमन श्री. अनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
शिक्षक नेते व सहकार तज्ज्ञ संचालक श्री. दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली, कोजिमाशि पतसंस्थेने सदैव सभासदांच्या हितासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सभासदांना उच्चांकी लाभांश, दीपावली भेटवस्तू आणि विविध योजनांचा लाभ देत यशस्वीपणे कामकाज चालविण्याचे काम शाखा चेअरमन अनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात कोजिमाशि पतसंस्थेचे सीईओ श्री. जयवंत कुरडे, डेप्यु. सीईओ श्री. उत्तम कवडे, तपासणी अधिकारी श्री. रमेश मेटील, शाखाधिकारी श्री. प्रशांत मोरबाळे, प्रधान कार्यालय समिती सदस्य श्री. जोतिबा पवार, तसेच सभासद राजेंद्र कुंभार, विजय ससे, दत्तात्रय नलवडे, प्रमोद खांबे, गौरव चव्हाण, अमोल पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.






