नवे पारगावात खंडोबा देवालयाचा रौप्यमहोत्सव उत्साहात
नवे पारगांव : नवे पारगांव,ता.हातकणंगले येथील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणारे कुळदैवत श्री म्हाळसाकांत खंडोबा देवालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमीत्त यंदाही सालाबादाप्रमाणे घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडल्याची माहिती मंदीर समितीचे अध्यक्ष आर.डी.तथा रामचंद्र लोखंडे यांनी दिली.
दररोज नित्यनियमाने पहाटे पुजा, अभिषेक,काकडआरती,’श्रीं’च्या विविध विधीवत रूपातील बांधलेल्या पुजा,रात्री भजन,सकाळी-रात्री आरती,तर विजयादशमीदिनी सायंकाळी गावातील मुख्य ग्रामदैवत हनुमान मंदीरापर्यंत श्रींच्या पालखीसह घोडा,सवाद्य पालखी मिरवणुक,रात्री जय मल्हार खंडोबा जागरण पार्टी आष्टा (सांगली) येथील बबन पवार वाघे आणि पार्टीचा ‘वाघ्या-मुरळी’ खंडोबा जागरण कार्यक्रमाने या खंडोबा देवालय रौप्यमहोत्सवी वर्धापनाची सांगता झाली.वर्धापन उत्सव समितीचे पुजारी महादेव लोखंडे,अध्यक्ष परशुराम लोखंडे,सचीव विनोद चौगुले,विनायक लोखंडे,हंबीर साठे,जयसिंग पांढरबळे यांचे सह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे तरुण मंडळाचे पदाधिकारी,जेष्ठ-कनिष्ठ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.यादरम्यान असंख्य भाविक भक्तांनी खंडोबा देवालयात उत्सवमुर्तींचे विधीवत दर्शन घेतले.





