न्यू इंग्लिश स्कूल कवठे एकंद मध्ये खंडेनवमी शस्त्र पूजा संपन्न
सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ
दि हिंद एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कवठे एकंद येथील पूर्व व्यवसाय अभ्यासक्रम कार्यशाळेमध्ये आज खंडेनवमीच्या निमित्ताने शस्त्र पूजा संपन्न झाली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधीर शिंदे सर यांचे हस्ते कार्यशाळेमध्ये शस्त्र पूजा करण्यात आली. तसेच तंत्र विभागाचे प्रमुख श्री पिसे सर भांडारपाल श्री चव्हाण सर यांनीही शस्त्र पूजा केली.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या व त्यांनी या शस्त्र पूजा कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक श्री. रंगराव भोसले सर यांनी सर्वांना पेढे देऊन हा आनंद साजरा केला.





