-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यास जगाने स्वीकारले: प्रा.नितेश रायकर

कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयात बोलताना प्रा. नितेश रायकर, डॉ . अंकुश बनसोडे, डॉ . महादेव शिंदे डॉ. प्रदीप गायकवाड आदी.

जागतिक वारसा स्थळांमधील महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून केल्याने छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर आत्ता जगाचे छत्रपती झाले. त्यांचे विचारकार्य जगाने सस्वीकारले असे प्रतिपादन मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्रा. नितेश रायकर यांनी केले. ते महावीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग आयोजित विश्व पर्यटन दिनानिमित्त महाविद्यालयात बोलताना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रातील गडकोटांचा संघर्ष आजही आपल्याला प्रेरणादायी असल्याचे मत इतिहास विभाग प्रमुख डॉ. महादेव शिंदे यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंकुश बनसोडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. चंद्रशेखर काटे यांनी केला, आभार डॉ. प्रदीप गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन दीक्षा काशिद व पूजा राठोड यांनी केले. यावेळी भित्तीपत्रके प्रदर्शनही करण्यात आले.

यावेळी प्रा. उत्तम वडिंगेकर, प्रा. पियुष डहाळे, प्रा. अमित पाटील, प्रा. सुरज चौगुले, श्री . सचिन बराटे व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles