विजय यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
करूर (तमिळनाडू), २७ सप्टेंबर २०२५ :तमिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व नव्याने राजकारणात प्रवेश केलेले थलपती विजय यांच्या तमिळग विजयी कळघम (टीव्हीके) या पक्षाच्या प्रचारसभेत भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत किमान ३६ जणांचा मृत्यू झाला असून ४० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
सभास्थळी अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोक जमले होते. कार्यक्रम संपताच लोकांनी व्यासपीठाच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला व अनेक जण खाली पडले आणि चेंगरले गेले.
या घटनेत महिला, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या दुर्घटनेचे प्राथमिक कारण गर्दीचे नियंत्रण न होणे, अपुरी व्यवस्था, तसेच उष्णता आणि दमछाक हे मानले जात आहे. प्रशासनाकडून चौकशी सुरू असून, मदतकार्य तातडीने राबवले जात आहे.





