-10.8 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

शामसुंदर महाराज सोन्नर यांना ‘गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

शामसुंदर महाराज सोन्नर यांना ‘गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध पत्रकार, जेष्ठ कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना ‘गाथा अभ्यासक मारुती महाराज जाधव तळाशीलकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून २९ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येईल, अशी माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख अरुण जाधव यांनी दिली.

हा पुरस्कार गाथा अभ्यासक मारुती जाधव तळाशीलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देण्यात येत आहे. यावेळी माजी खासदार सदाशिव मंडलिक, शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम महाराज अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे, साहित्यिक संपत देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्याच दिवशी वेदांत केशरी मारुती महाराज तुंतुने यांचे प्रवचन आणि लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे कीर्तन होणार आहे.

मारुती जाधव तळाशीलकर हे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेचे अभ्यासक होते. त्यांचे गाथा निरूपण शिवाजी विद्यापीठाने प्रसिद्ध केले असून, संत साहित्य व सामाजिक समतेच्या विचारांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. त्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार अशाच विचारांना वाहिलेल्या व्यक्तींना दिला जातो. त्यानुसार वारकरी संतांचा विचार समाजात रुजवण्यासाठी सातत्याने कार्य करणारे ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची यावर्षी निवड करण्यात आली आहे, अशी माहितीही अरुण जाधव यांनी दिली.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles